शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सामान्य रुग्णालयाला पंधरा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:22 IST

Khamgaon News : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सामान्य रुग्णालयाला पंधरा लाखांची मदत करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: वाढत्या कोरोना विषाणू संक्रमणामुळे सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेवर कमालिचा आर्थिक बोजा पडत आहे.  आरोग्य यंत्रणेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मदत म्हणून खामगाव कृउबासने उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम म्हणजेच १५ लाख रुपये खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द केले आहेत. कृउबासने कोविड उपाययोजनेसाठी निधी देण्याची मागणी मनसेचे विठ्ठल लोखंडकार यांनी पणन संचालकांकडे केली होती. कोरोना विषाणू संक्रमणामुळे गत दीड वर्षांपासून सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सामान्यांची चांगलीच ससेहोलपट होत असून कोविड रूग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये खाटा अपुºया पडत असल्याने अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत  खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम खर्च करून तात्काळ सर्व सुविधा असलेले कोविड सेंटर खोलण्याची मागणी सहकार सरचिटणीस शॅडो कॅबिनेट मंत्री मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी केली होती.  तसेच यासंदर्भात  संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला. पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांच्याशीही दोन वेळा चर्चा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री राजेंद्र शिंगणे  ,पणन संचालक  सतीश सोनी , जिल्हाधिकारी राममूर्ती ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  प्रशांत पाटील , जिल्हा उपनिबंधक राठोड, निवासी वैद्यकीय अधीक्षक  निलेश टापरे ,कृ. उ. बा. समिती प्रशासक  महेश कृपलानी,सचीव मुगुटराव भिसे यांनी सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य विकत घेण्याकरिता त्वरित प्रस्ताव तयार केला. त्यानंतर निधी उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा झाला.

तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळाअभावी सामान्य रूग्णालयाला मदत-अनुभवी डॉक्टर आणि स्टॉप  उपलब्ध होत नसल्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाला  १० आयसीयू बेड, बायोमेडीमॅक्स मल्टीपॅरा मॉनिटर-०६ आणि बेड साइड लॉकर खरेदी करण्यासाठी १५ लक्ष ३५ हजारांची मदत केली आहे. पणन संचालक सतीश सोनी यांनी लोखंडकार यांच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणखी १० अतिरिक्त बेड वाढविण्यास मदत झाली आहे.

- राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोरोना काळात स्वत:चे कोविड रूग्णालय सुरू करण्याची आपली मागणी होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळा अभावी खामगाव कृउबासने खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाला १५ लाखांची मदत केली आहे.- विठ्ठल लोखंडकारमनसे नेते, बुलडाणा. 

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती