बुलडाणा : मलकापूरवरून भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने समोरून येणार्या प्रवाशी अँपेला जबर धडक दिली. या अपघातात ८0 वर्षीय वृध्द महिला जागीच ठार झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मलकापूर रोडवरील महोबोधी बुध्द विहारासमोर घडली. दिल्ली येथून टायर्स घेऊन एच.आर. ३८, टि-३६३८ या क्रमांकाचा कंटेनर मलकापूर बुलडाणा मार्गे बंगलोरकडे जात होता. तर दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजूर येथील अँपे चालक शत्रुघ्न सोनाजी गायकवाड (३९) हा बुलडाणा येथून काही प्रवाशांना घेवून एम.एच. २८ / आर / २३२६ या क्रमांकाच्या अँपेने मोताळयाकडे जात होता. या अँपेतून मोताळा येथील ८0 वर्षीय गयाबाई तुळशीराम लांडेही वृध्द महिला प्रवास करीत होती. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या महाबोधी बुध्द विहाराजवळ मलकापूरहून येणार्या कंटेनरने समोरून येणार्या प्रवाशी अँपेला जबर धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की, या अपघातात गयाबाई लांडे यांचा कोपरापासून हात वेगळा झाला होता. रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातात अँपेमधील प्रवाशांना कुठलीच दुखापत झाली नाही. पोलिसांनी कंटेनर चालक ताहिर खान (२८, रा.मेबात हरियाणा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव कंटेनरची प्रवाशी अँपेला धडक, वृध्द महिला ठार
By admin | Updated: October 23, 2014 00:11 IST