शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाचा सत्कार

By admin | Updated: April 24, 2017 00:15 IST

चिंचपूर येथील विद्यार्थिनीचा आग्रह : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

मोताळा: तालुक्यातील चिंचपूर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या मुलीच्या आग्रहास्तव तिच्या कुटुंबाने कर्ज काढून शौचालय बांधले. शौचालय बांधून समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम शेलापूर केंद्रातील १२ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकशाहीचा जबाबदार नागरीक घडविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहेत. माझे कुटुंब, माझ्या जबाबदाऱ्या, स्वच्छतेची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरी शौचालय असावेच, असे महत्त्व विद्यार्थ्यांना वेळोवळी सांगितले जाते. यातूनच प्रेरणा घेऊन म.प्रा. शाळा चिंचपूर या शाळेतील इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली नूतन विष्णू धोरण हिने आपल्या घरी शौचालय बांधण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांचा शेतमजुरी व्यवसाय. गरिबीमुळे ते शक्य नव्हते. तरीही मुलीच्या हट्टासाठी आईने स्वत:चे मनी मंगळसूत्र, आजीच्या पाटल्या इ. दागीने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले व त्यातून शौचालय बांधले व त्याचा वापर करीत आहेत. मुलीच्या हट्टासाठी कर्ज काढून शौचालय बांधणारे हे कुटुंब समाजासाठी आदर्श ठरत असून, अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म.प्रा. शाळा चिंचपूर येथे त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता मापारी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पी.एस. मोरे, केंद्रप्रमुख डी.एस. प्राणकर हे होते. याप्रसंगी नूतन हीस स्कूलबॅग देऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले. केंद्रप्रमुख यांनी गणवेशासाठी आर्थिक मदत दिली. तर मुख्याधापिका निर्मला पाटील यांनी धोरण कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पांडे, अंगणवाडी सेविका यांनी मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यात दिसत असलेले बदल याबाबत माहिती दिली. संचालन अमर मापारी यांनी केले. कार्यक्रमास प्रमोद मापारी, माजी अध्यक्ष, शिक्षकवृंद, बाहेकर, मु.अ. शेलापूर, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.