शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

बहीण-भावाचे नाते अगदीच पवित्र नाते, मात्र याच नात्याला कलंक लावणारी घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात घडली आहे. वारंवार अत्याचार ...

बहीण-भावाचे नाते अगदीच पवित्र नाते, मात्र याच नात्याला कलंक लावणारी घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात घडली आहे. वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघांपैकी एक जण आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा चुलत भाऊच असल्याचे समोर आल्याने जिल्हाभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. २० सप्टेंबर रोजी एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी घरातील एका धार्मिक ग्रंथात पाच दिवसांनंतर सापडली. चिठ्ठी घेऊन तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच दोन तरुणांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी तरुण असून, त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहायक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बावस्कर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत.

--माझ्या शांत स्वभावाने घात केला--

आत्महत्या करणाऱ्या पीडित तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपीने तिचा कसा-कसा छळ केला, याचा उल्लेख केला आहे. वडिलांना सांगण्याची हिंमत नव्हती, आणि वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार करून होणाऱ्या अत्याचाराला सहन करीत गेली, पण या शांत स्वभावाने माझा घात केला, असा उल्लेख आत्महत्या करणाऱ्या तरुणीने चिठ्ठीत केला आहे.

--जिल्ह्यात महिन्याकाठी ९ अत्याचार--

जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ७४ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याची सरासरी काढल्यास जिल्ह्यात दर महिन्याला नऊ महिला, तरुणी विकृत वासनेला बळी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब चिंतेसह चिंतन करायला लावणारी अशीच आहे.

----

सामाजिक नातेसंबंधांना काळिमा फासणारी ही घटना आहे. अशा घटना व्यथित करून जातात. मात्र, महिला आणि मुलींनी होणाऱ्या अत्याचाराबाबत कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सांगावे. भीती न बाळगता थेट पोलीस स्टेशन गाठावे, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत.

(गिरीश ताथोड, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन)