शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इ-पॉसमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 18:35 IST

ई-पासची सक्ती रद्द करण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे. 

बुलडाणा : स्वस्त धान्य प्रणालींतर्गत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ई-पॉसच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू केले आहे. सध्या कोरोनाच्या काळात अनेक जण ई-पॉसवर बोटांचे ठसे ठेवत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे, ई-पॉसची सक्ती रद्द करण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे. राज्यभरात स्वस्त धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. त्यामुळे, शासननाने ई-पॉसच्या माध्यमातून धान्य वाटप सुरू केले आहे. सध्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामस्थांच्या बोटाच्या ठशांशिवाय धान्य वितरीत करण्यात येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. एखादा ग्राहक कोरोना पॉझिटीव्ह असल्यास त्याच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, स्वस्त धान्य दुकान संघटनांनी ई-पॉसची सक्ती न करण्याची मागणी केली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकान संघटना ई-पास सक्ती रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात गेली होती. त्यावर न्यायालयाने स्वस्त धान्य दुकान संघटनांच्या वतीने निकाल दिल्याची माहिती मेहकर तालुका स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली.जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, गावागावात स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. एका स्वस्त धान्य दुकानदाराकडे जवळपास ६०० कार्डधारकांना जोडण्यात आलेले आहे. महिन्यातून दोन वेळा स्वस्त धान्याचे वितरण होते.त्यामुळे एकाच महिन्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा १२०० ग्रामस्थांशी संपर्क येतो. त्यामुळे, स्वस्त धान्य दुकारांनामध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना संक्रमण संपेपर्यंत ई-पॉस बंद करण्याची मागणी स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच ई-पॉसवर ग्राहकांचे ठसे घेतल्याशिवाय धान्य वितरण करता येत नाही. ग्राहकांचे बोटाचे ठसे सॅनिटाईज करून ई-पॉसवर घेतल्या जातात. मात्र,कोरोना संक्रमणाची भिती आहे. न्यायलयानेही आमच्या बाजुने निकाल दिल्याने शासनाने ई पॉसची सक्ती शिथील करण्याची गरज आहे. विनोद देशमुख, मेहकर तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या