शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या भीतीने आरटीईची सोडत आता ‘व्हीसी’द्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:54 IST

प्रत्यक्ष सोडत न करता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे १७ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बालकांचा सक्तीचा व शिक्षणाचा अधिकार अधिनयमय २००९ (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचीत व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शासनाकडून संपूर्ण राज्यामध्ये दरवर्षी एकदाच आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र यावर्षी ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्यक्ष सोडत न करता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे १७ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. पालकांनी सदर प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश सोडतीद्वारे निश्चित करण्यात येतो. परंतु यावर्षी नॉव्हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता आरटीई प्रवेशाची लॉटरी ही १७ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे काढण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरटीई प्रक्रिया राबविणाऱ्या शाळा, पंचायत समिती कार्यालयांनी याबाबत पालकांना अवगत करणे गरजेचे आहे.आरटीई प्रक्रियेच्या लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना याबाबतचा संदेश त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येतो. तथापि, काही तात्रिक अडणीमुळे पालकांना प्रवेशाबाबतचा संदेश न मिळाल्यास पालकांनी संकेतस्थळावर भेट दिल्यास सुद्धा प्रवेशाबाबतची स्थिती पाहता येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी. लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना पंचायत समिती स्तरावर असलेल्या कागदपत्र पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी कागदपत्र पडताळणी समितीकडे एकाच वेळेस जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई. झेड. खान यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा