शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कोरोनाची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 10:55 IST

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाºया शेतकºयांमध्येही धास्ती वाढली आहे.

ठळक मुद्देबाजार समितीमध्ये होणारी गर्दी पाहता कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे.खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून शेतमाल विक्रीसाठी जातो. त्यामुळे खामगावशी अनेक शेतकºयांचा संपर्क येतो. खामगावपासून सुमारे पाच कि़मी. अंतरावर असलेल्या जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाºया शेतकºयांमध्येही धास्ती वाढली आहे. बाजार समितीमध्ये होणारी गर्दी पाहता कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना बाधित रुग्णाचा पहिला मृत्यू २८ मार्च रोजी झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्यात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दरम्यान, मध्यंतरी सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा जळगाव जामोद येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. टप्प्या-टप्प्याने घाटाखाली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आता याठिकाणी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामगाव येथे मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यामुळे याठिकाणी खामगाव तालुक्यासह मेहकर, लोणार, बुलडाणा, चिखली व इतर तालुक्यातूनही शेतमाल विक्रीसाठी येत असतो. लॉकडाउनमुळे अनेक शेतकºयांचा शेतमाल घरात पडून होता. दरम्यान, लॉकडाउनच्या नियमामध्ये शिथिलता दिल्याने अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी काढला. परंतू खामगावपासून जवळ असलेल्या जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने माल घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये भिती आहे.

गावातील नागरिकांचा खामगावशी संपर्कखामगाव तालुक्यातील जळका भडंग सारख्या छोट्याश्या पॉझिटिव्ह असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. या गावातील नागरिकांचा पिंपळगाव राजा व खामगाव शहराशी सातत्याने संपर्क येतो. या गावातील नऊ कोरोना बाधीत रुग्ण हे खामगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहेत त्यांच्यावर खामगाव याठिकाणीच उपचार सुरू आहेत. हे पॉझिटिव्ह रुग्ण आणखी कोठे-कोठे गेले याचा शोध घेण्यात येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या