शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजनेचे काम पाहणाऱ्यास पाच वर्षापासून मानधन नाही; जानेफळ ग्रामपंचायतसमोर  उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 18:40 IST

पैसे देण्यास सुद्ध टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध परशराम डोंगरे यांनी जानेफळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ११ मे पासून उपोषणास सुरवात केली आहे.

ठळक मुद्देपरशराम नामदेव डोंगरे हे मे २०१३ पासून जानेफळ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेच्या कामावर मानधन तत्वावर कार्यरत आहेत.पाच वर्षापासून नळयोजना सुरू आहे, असे असताना ग्रामपंचायतीकडून मात्र त्यांना मानधन देण्यात आले नाही.अखेर  परशराम डोंगरे यांनी यांनी ११ मे पासून ग्रा.पं. कार्यालयाच्या बाजुला उपोषण सुरू केले आहे.

जानेफळ: नळयोजनेच्या कामावर मानधन तत्वार कार्यरत असताना गेल्या पाच वर्षांपासून पगार देण्यात न आल्याने व नळयोजनेसाठी आणलेल्या साहित्याचे पैसे देण्यास सुद्ध टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध परशराम डोंगरे यांनी जानेफळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ११ मे पासून उपोषणास सुरवात केली आहे.         येथील परशराम नामदेव डोंगरे हे मे २०१३ पासून जानेफळ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेच्या कामावर मानधन तत्वावर कार्यरत आहेत. या काळात त्यांनी पूर्णवेळ काम करून नळयोजनेसाठी लागणारे साहित्य सुद्धा विकत आणून नळयोजनेसाठी लावलेले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये  खंड पडू न देता नियमित पणे गेल्या पाच वर्षापासून नळयोजना सुरू आहे, असे असताना ग्रामपंचायतीकडून मात्र त्यांना मानधन देण्यात आले नाही. त्यांनी नळयोजनेसाठी आणलेल्या साहित्याची रक्कम मिळून ७ लाख ८० हजार रुपये घेणे बाकी असताना देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असल्याने स्वत:च्या कुटूंबासह मुलाच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर आहे. नवीन सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत अवगत करुन सुद्धा त्यांनीही याकडे लक्ष दिले नसल्यामुळे अखेर  परशराम डोंगरे यांनी यांनी ११ मे पासून ग्रा.पं. कार्यालयाच्या बाजुला उपोषण सुरू केले आहे. मेहकर पं.स. चे विस्तार अधिकारी सोनुने, प्रभारी ग्रा.वि. अधिकारी डी. आर. आंधळे यांनी उपोषण मंडपास भेट देऊन आपल्या प्रकरणाची लवकरच चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्ते डोंगरे यांनी याला न जुमानता उपोषण सुरुच ठेवले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत