शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:41 IST

Crop insurance News नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.

ठळक मुद्देपीक विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर. आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  खरीप हंगामात माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. पीक विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर असून, शेतकऱ्यांकडे आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. त्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा याेजना राबविण्यात येते. खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. ऑक्टाेबर, नाेव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, रब्बीचा पीक विमा काढण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.

निकषाचा फटका खरीप हंगामातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमा काढूनही मदत मिळालेली नाही. विमा कंपनीचे निकष शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहेत. त्यामळे, रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विम्याची भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.      -  सुधाकर राऊत, अंजनी बु.

नुकसान भरपाईची प्रतीक्षाच खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिकांचा विमा काढला हाेता. खरिपातील मूग, उडीद आणि साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मूग, उडिदाच्या शेंगांना काेंब फुटले हाेते. खरिपाची जवळपास सर्वच पिके हातून गेल्यावरही अनेक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच आहे. मदत मिळेल किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांना माहिती नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा