खामगाव : हमीदराने तूर खरेदी केंद्र बंद होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटत असतानासुद्धा शेतकऱ्यांचा या केंद्रांवर तूर ठेवून मुक्काम कायम आहे. खुल्या बाजारात तुरीला प्रतिक्ंिवटल चार हजाराचासुद्धा दर नसल्याने हमीदरावरील ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटलने तूर विकण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, शेतकरी आशेने या केंद्रावर बसून आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी या केंद्रांवर केली आहे, अशांची तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याची चर्चा होत असताना बुधवारी तिसऱ्या दिवशीही तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही; मात्र लवकरच तुरीचे मोजमाप होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. या तूर खरेदी केंद्रावर माल कमी असलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या मोजमापाला प्राधान्य द्यावे, अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
शेतकऱ्यांचा तूर विक्री केंद्रांवर ‘ठिय्या’ कायम!
By admin | Updated: April 27, 2017 00:11 IST