सोनोशी (जि. बुलडाणा) : सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून सोनाशी येथील कारभारी नारायण जायभाये (६५) या शेतकर्याने गावालगतच्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे १५ जूनच्या सकाळी उघडकीस आले.कारभारी जायभाये यांच्याकडे चार एकर शेती होती. त्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सिंदखेड राजा शाखेतून १ लाख ५५ हजार रुपये कृषिकर्ज घेतले होते. या कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांना एक एकर शेती विकावी लागली होती. कर्जबाजारी झाल्याने नैराश्य पसरले असतानाच आताही ऐन पेरणीच्या काळात पैसा कुठून आणावा, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: June 16, 2016 02:24 IST