मोताळा (बुलडाणा) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. तालुक्यातील गुगळी येथील दिवाकर दिनकर वरखेळे (वय ३५) यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. पोफळी येथील स्टेट बँकेचे कर्ज असल्याचे समजते. मागील वर्षी जेमतेम उत्पन्न व यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे पूर्ण पीक नष्ट झाले. सततच्या नापिकीने कुटुंबाचा उदरनिर्वाह व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विचाराने दिवाकर वरखेळे हे चिंताग्रस्त राहत होते. या विवंचनेत त्यांनी २२ नोव्हेंबरच्या रात्री घराजवळील गुरांच्या गोठय़ात जावून किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. बराचवेळा नंतर गेल्यावर घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता, दिवाकर हे गुरांच्या गोठय़ात आढळून आले. अत्यावस्थेत त्यांना बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा आप्त परिवर आहे.
विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: November 24, 2014 00:44 IST