शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:40 IST

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू कापासाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेक शेतातील कापूस ओला झाला. काही ठिकाणी कापसाची बोंडे भिजली. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २६३ आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. जिल्हाभर झालेल्या पावसाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतो. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

पांढºया सोन्याला सुर्याची उबकिनगाव जट्टू: परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाने भिजलेला कापूस वाळविण्याची कसरत शेतकºयांची सुरू आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकºयांनी कापासाची वेचणी सुरू केली. परंतू ओला कापूस दाबून पिवळा पडेल, अगोदारच कापसाचे दर कमी त्यामुळे शेतकरी ओल्या कापासाला वाळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

१०७ टक्के कपाशी पेराजिल्ह्यात कपाशीचा पेरा १०७ टक्के म्हणजे २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. परंतू पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. कपाशीच्या बोंडालाच कोंब आले आहेत. दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्यानंतर आता पावसाचा फटका कपाशी उत्पादनाला बसला आहे.

कापूस वेचण्यासाठी मिळेना मजूरपावसामुळे कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाच्या उघडीपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजूरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिली वेचणी सोबतच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेतीcottonकापूस