शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मक्याच्या नोंदणीसाठी बोचऱ्या थंडीत जागून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:47 IST

Buldhana Agriculture News रविवार दिवस आणि रात्रभर बोचऱ्या थंडीचा सामना शेतकऱ्यांनी केला.

- सुहास वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरा : आधी रात्रंदिवस काबाडकष्ट करून पीक पिकवायचे व मग  हमीभाव मिळावा म्हणून  फक्त नोंदणीसाठी रात्रभर  बोचऱ्या थंडीत  काढून दिवसभर ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता संघर्ष करण्याची वेळ नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर शासन व प्रशासनाने आणल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. खरेदी विक्री संघात हमीभावाने मक्याच्या खरेदी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सोमवारी सुरू झाली. त्यासाठी चोवीस तासापूर्वीच म्हणजे रविवारी सकाळापासूनच खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रांग तयार केली. रविवार दिवस आणि रात्रभर बोचऱ्या थंडीचा सामना शेतकऱ्यांनी केला. दिवसभर तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज सादर केले.  व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात मक्याची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. सोमवारी सकाळीच मोठी गर्दी झाली. त्यासाठी चक्क ठाणेदार व पोलिसांना बोलावून गर्दी नियंत्रित करावी लागली.  शासन व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी रात्रंदिवस जागून संघर्ष करावा लागत असल्याचे पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त  केला. 

मागील वर्षी हमीभाव न मिळाल्याने झाली गर्दीमक्याची हमीभावाने खरेदी उशिराने सुरु होऊन फक्त दोन महिने एवढय़ा कालावधीत चालते. त्यामध्ये खरेदी विक्री संघाची मोजण्याची क्षमता कमी असल्याने मागीलवर्षी उशिरा नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्या  मक्याची मोजणी झाली नाही व त्यांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी यावेळेस एकच गर्दी करून पहिला नंबर  मिळविण्याचा प्रयत्न केल्याने सर्व गोंधळ उडाला होता. 

पहिल्याच दिवशी एक हजार अर्ज नोंदणीसाठी झालेले गर्दी पाहता खरेदी विक्री संघ कार्यालयातील काम थांबवून खासगी कंपनीला  दिल्याची माहिती सहाय्यक निबंधक  कृपलानी यांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी खाजगी शेतकरी कंपनी करणार आहे. 

केंद्रातून ऑनलाइन नोंदणीचा पर्याय प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून गावातूनच नोंदणी करण्याचा पर्याय उपल ब्ध केल्यास  शेतकर्यांना त्रास झाला नसता. यापुढे गावातूनच ऑनलाईन नोंदणीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे  झाले आहे.