शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे - भाऊसाहेब फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:19 IST

रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे पौष्टिक अन्नधान्य मिळेल व आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.

ठळक मुद्देशेतकरी जागर यात्रेचा शुभारंभरासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरलीमशागत करताना गाईचे शेण व गोमूत्राचा वापर करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : विदर्भात वनसंपदा, जलसंपदा, सुपीक जमीन व नैसर्गिक संपदा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असूनदेखील बळीराजा मोठय़ा प्रमाणात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. हे टाळण्यासाठी यापूर्वीच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज होती; परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे पौष्टिक अन्नधान्य मिळेल व आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.भारतीय गोवंश रक्षण, संवर्धन परिषदद्वारा शेतकरी जागर यात्रेचा शुभारंभ सिंदखेडराजा येथून १५ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अभिवादन करून १५ जानेवारी रोजी प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. सदर जागर यात्रा सिंदखेडराजावरून निघणार असून, वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम पावन भूमिमध्ये समारोप होणार आहे. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम शेती औजारांचे विधिवत पूजन करून गोमातेचेसुद्धा पूजन केले.  यावेळी नारायण महाराज शिंदे, उद्धव हिवराळे, समाधान शिंगणे, सनदाजी गुप्ता, डॉ.हेमंत जांभेकर, दिवाकर नेरकर, अँड.अमोल अंधारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कृषी अधिकारी बीपीन राठोडसह कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर