शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्नांची पराकाष्ठा करणे शेतकऱ्यांकडून शिकावे -रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:32 IST

चिखली : कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता प्रयत्नांची पराकाष्ठा करत शेतकरी जिद्दीने मेहनत करीत असतात, ही बाब प्रत्येकाने शेतकऱ्यांकडून ...

चिखली : कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता प्रयत्नांची पराकाष्ठा करत शेतकरी जिद्दीने मेहनत करीत असतात, ही बाब प्रत्येकाने शेतकऱ्यांकडून शिकली पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा त्यांनी सत्कार केला.

चिखली तालुक्यातील मंगरूळ (इ) येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार मिळाला तर मलगी येथील अनिता रामसिक.............. पवार व रामसिंग............. पवार या दाम्पत्यालादेखील स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरमध्ये रविकांत तुपकरांनी यथोचित सत्कार केला. इतर शेतकऱ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा देण्याचे काम या शेतकऱ्यांनी केले आहे, अशा शब्दात तुपकरांनी या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी अ‍ॅड. शर्वरी तुपकर, चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, पं. स. कृषी अधिकारी सोनुने, मंडळ अधिकारी देशमुख, अंभोरे, पवार, वाणी, अतुल खरोडे यांच्यासाह बुलडाणा व चिखली तालुक्यातील आदर्श शेतकरी व सरपंच यांच्यासह राणा चंदन, रामेश्वर अंभोरे, पवन देशमुख, आकाश माळोदे, हरिभाऊ उबरहंडे आदी स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.