शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी उर्जादाता व्हावे, डांबरनिर्मिती करावी : नितीन गडकरी

By सदानंद सिरसाट | Updated: August 18, 2023 15:06 IST

पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे.

खामगाव (बुलढाणा) : पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे. त्यामध्ये बदल होण्यासाठी शेतकऱ्यांनी आता उर्जादाता व्हावे, डांबरनिर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मलकापूर येथे केले. नांदुरा ते चिखली रणथम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे लोकार्पण ना. गडकरी यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार राजेश एकडे, अँड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अतिथी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. गडकरी यांनी रस्त्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ टक्के काम येत्या महिन्याभरात ते पूर्ण होईल. या रस्त्याने गुजरातमध्ये वेगाने पोहचता येईल. विदर्भाच्या विकासासाठी रस्त्याचा विकास महत्त्वपूर्ण आहे.

त्यासाठीच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. त्याचा फायदा आता कृषी उत्पादनाला वेळेत पोहचवण्यासाठी होईल. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांसोबतच वीजनिर्मिती करावी, इथेनाँल, डांबर निर्मितीसाठी विविध उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने येत्या काळात राबवल्या जातील. त्यासाठी असलेल्या शासकीय योजनाही सुरू केल्या जातील, त्याचा शेतकऱ््यांना लाभ होईल. त्यामुळे विदर्भातील बेकारी, भूकबळी, आत्महत्यांना आळा बसेल, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील रस्ता विकासाच्या झालेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली.