शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीसाठी शेतकऱ्यांचे रस्ते केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 11:47 IST

Samruddhi Mahamarg News कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंती बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे.शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेतरस्त्यांची तरतूद केलेली आहे.शेतरस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे.   भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंती बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घरी कसा न्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, तसेच रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या बाेगद्याची उंची कमी असल्याने, त्यामधून वाहने तर दूर साधे माणसेही जाऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.मेहकर  तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व त्यांचा शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेतरस्त्यांची तरतूद केलेली आहे. असे असतानाही कंपनीमार्फत मात्र सदर शेतरस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे.  यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने सदर काम हे आंध्रुड येथे सुरू होतातच बंद पाडण्यात आले आहे. याबाबत शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या  कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. त्यांना वस्तुस्थितीची जाणीवही करून देण्यात आली आहे. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अद्यापही रस्त्याच्या बाबतीत हा  प्रश्‍न सोडविला नाही. भविष्यात शेतरस्ता सोडला नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसणार आहे. यासोबतच शेतातील नैसर्गिक पद्धतीने वाहणारे पाणी यालाही अडसर निर्माण होऊन हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात थांबणार आहे.  शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

गावरस्तेही झाले बंद खंडाळा ते पिंर्प्री माळी, अंजनी बुद्रुक ते उमरा, आंध्रुड ते डोणगाव ही गावे एकमेकांना शेत रस्त्यांच्या माध्यमातून जोडला जात होती. मात्र, सदर रस्ता समृद्धी महामार्गाने बंद केला असून, या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. 

समृद्धी महामार्ग प्रोजेक्टमध्ये तरतूद असलेला शेतरस्ता सोडून सदर कंपनीने संरक्षण भिंतीचे काम करावे, अन्यथा हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही, तोपर्यंत आम्ही संरक्षण भिंतींचे काम बंद पाडू.   - प्रदीप देशमुख, अध्यक्ष, समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समिती, मेहकर

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMehkarमेहकरbuldhanaबुलडाणा