शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी गजबजली कृषी उत्पन्न बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:27 IST

बुलडाणा: एका दिवसावर दिवाळी सण आला असल्याने  जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी  शेतकर्‍यांची गर्दी वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले  असून, या सोयाबीनवर दिवाळी साजरी करण्यासाठी बाजार  समिती शेतकर्‍यांनी गजबजली आहे. 

ठळक मुद्देदिवाळीच्या पृष्ठभूमीवर गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एका दिवसावर दिवाळी सण आला असल्याने  जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी  शेतकर्‍यांची गर्दी वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले  असून, या सोयाबीनवर दिवाळी साजरी करण्यासाठी बाजार  समिती शेतकर्‍यांनी गजबजली आहे. मूग, उडीद या पिकांपाठोपाठ आता सोयाबीन पीकही कृषी उत्पन्न  बजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत आहे. दिवाळीचा सण  तोंडावर आल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीमध्ये  शेतकर्‍यांची एकच गर्दी होत आहे. गत चार वर्षांपासून  दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी खरिपातील  सोयाबीन पिकाचे समाधानकारक उत्पन्न झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने  जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीनचे पीक चांगले झाले.  मध्यंतरीच्या काळात पावसाने विश्रांती घेतल्याने थोड्या बहुत  प्रमाणात सोयाबीन उत्पादनला फटका बसला; मात्र सुरुवातीला  झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षी सोयाबीन उत्पन्नात वाढ  झाली; परंतु तरीसुद्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समि तीमध्ये तसेच खासगी बाजारामध्ये सोयाबीनला चांगले भाव  मिळत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आतापर्यंत  सोयाबीन विक्रीकरिता  काढले नव्हते; परंतु आता दिवाळी सण तोंडावर आल्याने तसेच  बी-बियाणे आणि पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याकरिता  अनेकांनी आपले सोयाबीन  विक्रीसाठी काढले आहे. दिवाळी  सण थाटामाटात साजरा करण्यासाठी सोयाबीन व इतर शेतमाल  विकल्याशिवाय शेतकर्‍यांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अनेक  शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री  करण्यासाठी गर्दी करत आहेत.   दिवाळी सण एका दिवसावर  आल्याने  जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या शेतकर्‍यांनी  गजबजल्या असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समितीसमोर लागताहेत वाहनांच्या रांगा!सोयाबीनला योग्य भाव नसला तरी दिवाळी सणाचा खर्चासाठी  सोयाबीनची विक्री करणे शेतकर्‍यांसाठी गरजेचे आहेत. त्यामुळे  दिवाळी सणाचा खर्च भागविण्यासाठी गत चार दिवसांपासून कृषी  उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठय़ा प्रमाणात  वाढली आहे.  बाजार समितीमध्ये सकाळपासूनच विविध  सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची गर्दी दिसून आली  आहे. बाजार समितीसमोर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या  वाहनांच्या रांगा लागत आहेत.  

टॅग्स :agricultureशेती