शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

पीक कर्जासाठी थेट बँकांनाच देणार शेतक-यांची कागदपत्रे!

By admin | Updated: April 23, 2017 01:08 IST

बुलडाणा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम

विवेक चांदूरकरबुलडाणा : खरीप हंगामासाठी पिककर्ज काढताना शेतकर्‍यांना आता तलाठय़ांच्या मागे फिरण्याची गरज राहणार नसून, सातबारासह शेतकर्‍यांची पिककर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सरळ बँकांकडे पोहोचविण्यात येणार आहे. बुलडाणा तहसलदारांनी हा निर्णय घेतला कर्जवाटप करणार्‍या बॅकांकडून शेतकर्‍यांची यादी मागविण्यात आली आहे. जून महिन्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीला प्रारंभ होतो. या हंगामाकसाठी पीक कर्ज घेण्याकरिता मे महिन्यापासून शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांकडून अद्यावत सातबारा, आठ अ, हैसीयत दाखला यासह विविध कागदपत्रे घ्यावी लागतात. बहुतेक तलाठय़ांकडे दोन ते तीन गावांचा प्रभार असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना ही कागदपत्रे मिळविण्याकरिता तलाठय़ांच्या मागे चकरा माराव्या लागतात. या दरम्यान शेतकर्‍यांची पिळवणूकही होते. या सर्व प्रकारास आळा घालण्याकरिता तहसीलदार सुरेश बगळे यांनी पुढाकार घेतला असून, तहसीलदारांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांना बुलडाणा तहसील अंतर्गत पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची यादी मागविली आहे. शेतकर्‍यांचे सातबारा, आठ-अ व हैसीयतचा दाखला तहसील कार्यालय तयार करणार आहे. संपूर्ण दाखले ई-महासेवा केंद्रावरून काढून ते सरळ बँकांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. परिणामी बँकांना शेतकर्‍यांचे अद्ययावत कागदपत्रे एकाच वेळी मिळतील व पीक कर्ज देण्यासाठी सोईचे होईल. राज्यातील पहिलाच प्रयोग! -राज्यात खरीप हंगामात लाखो शेतकरी पीक कर्ज घेतात. शेतकर्‍यांना नवीन कर्ज घेण्याकरिता काही कागदपत्रांची गरज असते. त्याकरिता त्यांना तलाठय़ांच्या मागे फिरून पैसेही द्यावे लागतात. याबाबत अनेकदा शेतकर्‍यांनी तक्रारी दिल्या आहेत. तसेच आंदोलनही केले आहे. मात्र, याची कुणीही दखल घेतली नाही. या शेतकर्‍यांची कागदपत्रे थेट बँकांमध्ये पोहोचविण्याचा बुलडाणा तहसिलदारांचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. कागदपत्रांसाठी बनविणार विशेष यंत्रणा! बँकांकडून शेतकर्‍यांची यादी घेऊन त्यांची कागदपत्रे तयार करण्याकरिता तहसील कार्यालयात विशेष यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील मधील कर्मचारी तथा तलाठय़ांचा यामध्ये समावेश असणार आहे.शेतकर्‍यांना पीक कर्ज घेताना सातबारासह विविध कादगपत्र गोळा करावे लागतात. शेतकर्‍यांचा हा त्रास कमी करण्याकरिता आम्ही सरळ बँकांकडून पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची यादी घेऊन बँकेत कागदपत्र पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही कागदपत्रे तयार करण्याकरिता काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल. यामुळे शेतकर्‍यांचा त्रास वाचणार आहे. - सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा