शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्याच्या मुलीचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 16:43 IST

Buldhana News शेतमजूरी करणारे शेतकरी साहेबराव सोनोने यांच्या स्वाती नामक मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तीचा एमबीबीएससाठी  शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यानंतरही जातवैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध न झाल्याने शेतमजूर कुटुंबातील मुलीचे डाँक्टर बनण्याचे स्वप्न भंगले आहे. सोनाळा येथील पिंगळी वेशीवर राहत असलेले शेतमजूरी करणारे शेतकरी साहेबराव सोनोने यांच्या स्वाती नामक मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. स्वातीने गावातील श्री संत सोनाजी महाराज हायस्कुलमध्ये दहाव्या वर्गात ९७ टक्के तर १२ व्या वर्गात ८५ टक्के गुण मिळवले. गोवारी समाजातील असल्याने जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्वाती सोनोने हिने १६ ऑगस्स्ट २०१९ मध्ये समितीच्या अमरावती कार्यालयाकडे अर्ज केला होता. प्रवेशाच्या वेळेपर्यंत तिला प्रमाणपत्र नाकारले नाही आणि दिलेही नाही. अनुसुचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयात तीन दिवस चकरा मारूनही समितीकडून वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. तीचा एमबीबीएससाठी श्री भाऊसाहेब हिरे मेडीकल काॅलेज वर्धा येथे नंबर लागला.  प्रवेशासाठी तिची सर्व तयारी झाली. मात्र, अनुसुचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे काॅलेजमध्ये तिचा प्रवेश झाला नाही.

वैधतेसाठी २०१९ मध्ये अर्ज केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. समितीच्या अधिकाऱ्यांनी वेळेपर्यंत निर्णय घेतला नाही. अखेर महाविद्यालयाने प्रवेश नाकारला.- स्वाती सोनोने, विद्यार्थीनी सोनाळा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी