शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेड परिसरातील शेतकर्‍यांनी उभ्या सोयाबीनमध्ये घातली मेंढरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:01 IST

बोरखेड: परिसरातील शेतकर्‍यांना सोयाबीनचे पीक तयार करणे  परवडत नसून, नाइलाजास्तव काही शेतकर्‍यांनी उभ्या  सोयाबीनच्या शेतात मेंढरे चारून रोटर मारणे चालू केले आहे. 

ठळक मुद्देसोयाबीनच्या शेंगा पोकळ असल्याने पीक झाले डोईजडउत्पादन घटण्याची शक्यता; शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड: परिसरातील शेतकर्‍यांना सोयाबीनचे पीक तयार करणे  परवडत नसून, नाइलाजास्तव काही शेतकर्‍यांनी उभ्या  सोयाबीनच्या शेतात मेंढरे चारून रोटर मारणे चालू केले आहे.  यावर्षी वातावरणातील दोषामुळे सोयाबीनच्या झाडांना योग्य  प्रमाणात शेंगा धरल्या नाहीत. तसेच मोठय़ा प्रमाणात शेंगा पोकळ  राहिल्या. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा,  पलसोडा, सगोडा, पिंगळी, सायखेड, दानापूर या भागात  सोयाबीनचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. आज रोजी  मजुरांकडून सोयाबीन सोंगण्याचे एकरी १,३00 रुपये व मशीनने  काढणे एकरी १,२00 रुपये अशी मजुरी आहे. अशातच  हार्वेस्टरने तयार करणे १,५00 रुपये एकरी दर चालू आहे व  सोयाबीनचे एकरी उत्पादन जवळपास १ ते २ क्विंटलवर  थबकले. नाइलाजाने तयार केलेले सोयाबीन शेतकर्‍यांना  विकणेच आहे. अशातच व्यापार्‍यांनी सोयाबीनचे बारीक दाणे व  ओलसरपणाचे कारण देत १६00 ते २२00 रुपये प्रति क्विंटलने  खरेदी चालू केली आहे. यापुढे दैनंदिन घरखर्च, लोकांचे देणे व  मुलांचा शैक्षणिक खर्च कसा चालवावा, या विवंचनेत सोयाबीन  उत्पादक शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उभ्या  सोयाबीनमध्ये मेंढरे घातल्याचे दिसून येत आहे. तरी  त्वरित  शासनाकडून सोयाबीन पीक विमा मंजूर करून मदत मिळण्याची  गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती