शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनाही मिळणार रेशनची साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:44 IST

Buldhana News प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणानिमित्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे एपीएल अंतर्गत शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे. बुलडाणा  जिल्ह्यात त्यानुषंगाने ४,२२६ क्विंटर साखर वितरीत करावी लागणार आहे. परिणामी या लाभार्थ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाने नऊ नोव्हेंबर रोजी अनुषंगीक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी आणि अंत्योदय लाभार्थी शिधापत्रिकाधारक असलेल्या ४ लाक ८२ हजार ९६२ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. साधारणत: अंत्योदय लाभार्थ्यांना साखर दिल्या जात होती. मात्र कोरोना संसर्ग व तत्सम बाबी पाहता यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व राज्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकाधराक कुटुंबांना प्रती कुटुंब एक किलो प्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २० रुपये दर ठेवण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यातंर्गत ३ लाख ५७ हजार, ४५२ कार्डधारक असून त्यामध्ये १५ लाख १९ हजार २१५ लोकसंख्या येते तर एपीएल शेतकरी लाभार्थ्यांमध्ये ८५ हजार २०५ कार्डधारक असून त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या ३ लाख ७७ हजार ३१४ येते. अंत्योदय अंतर्गत तर पुर्वीवापसूनच साखर वाटप करण्यात येते. त्याचे ६४ हजार ८१० कार्डधारक असून ३ लाख २ हजार ८२९ लोकसंख्या त्यातंर्गत अंतर्भूत आहे. दरम्यान नऊ नोव्हेंबर रोजीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भाने प्थमत: संबंधित जिल्ह्यांसाठी पुरवठादाराकंडून साखरेचा करार करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सध्या युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दीपोत्सवादरम्यान लाभार्थ्यांना येत्या आठवड्यात ही साखर प्रत्यक्ष हाती पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र पुरवठा विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा