लोणार(जि. बुलडाणा) : शेतमाल विकून घरी जात असलेल्या भूमराळा येथील एका शेतकर्याला अज्ञात दोन जणांनी किन्ही गावालगत अडवून मारहाण केली आणि १५ हजार रुपये लुटल्याची घटना शनिवारी घडली. तालुक्यातील भूमराळा येथील शेतकरी अंबादास रुस्तुम मोरे यांनी शनिवारी कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये शे तमाल विक्रीकरिता आणला होता. शेतमालाची हर्रास होऊन हिशेबपट्टी झाल्यानंतर अंबादास मोरे हे मिळालेले पैसे घेऊन एमएच २८ - ८७८२ क्रमांकाच्या मोटारसायकलने आपल्या गावाकडे निघाले. किन्ही गावालगत ते आले असताना दोन अज्ञात इसमांनी अंबादास मोरे यांना अडवून मारहाण केली तसेच त्यांच्याजवळील १५ हजार रुपये लुटून नेले. यासंदर्भात लोणार पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या परिसरात चोरी व लुटीच्या घटना वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतक-याचे १५ हजार रुपये लुटले
By admin | Updated: December 14, 2015 02:24 IST