शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मळणी यंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:22 IST

Buldhana, Accident, Farmer सोयाबीन सोंगणीदरम्यान एका शेत मजुराचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला.

ठळक मुद्दे गणेश राजाराम खेडवनकर या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारात सोयाबीन सोंगणीदरम्यान एका शेत मजुराचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना आठ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत ३५ वर्षीय गणेश राजाराम खेडवनकर या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. गणेश राजाराम खेडवनकर हे चार मजुरांसमवेत मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीचे काम करत होते. दरम्यान, सकाळी काम करत असताना गणेश खेडवनकर यांनी हाताला बांधलेला कापड मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने त्याच्या सोबत तेही त्यात ओढल्या गेले. त्यातच त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश सावळे यांनी अमडापूर पोलिस ठाण्याला दिली त्यानंतर ठाणेदार वानखेडे व बीट जमादार तोंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठवले होते. मृत गणेश खेडवनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, लहान भाऊ आणि आई वडील आहेत. अमडापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे डोंगरशेवली गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात