शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात नांगरणी करताना वीजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील घटना

By अनिल गवई | Updated: June 16, 2023 12:35 IST

घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: शेतात नांगरटी करण्यास गेलेल्या एका ३२ वर्षीय शेतकर्याचा वीजेचा धक्का लागल्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील ३२ वर्षीय शेतकरी श्रीधर दयाराम पटोकार शुक्रवारी पहाटे नांगरटी करण्यासाठी गेले. नांगरटी करताना शेतात पडलेल्या विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने पटोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गत तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वार्यात पिंप्राळा परिसरात काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले होते. या खांबावरील विद्युत तारेत जिवंत प्रवाह असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीकडे केली होती. मात्र, तरीही वीज तारांची दुरूस्ती तसेच प्रवाह बंद न करण्यात आल्यानेच युवा शेतकर्याचा मृत्यू झाला. अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी घटनास्थळी मांडली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारीही तेथे पोहोचला. त्यावेळी या कर्मचार्याला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही संतप्त ग्रामस्थांनी या कर्मचार्याला मारहाण केल्याचेही वृत्त समोर येत आहे. याप्रकरणी प्रत्येक हालचालीवर ग्रामीण पेालीस लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंचनामा करून मृतक शेतकर्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगाव