शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या, सिंदखेड राजातील सावखेड तेजन येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच स्वत:चे सरण रचून विष प्राशन करीत  सरणावरच स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी  उघडकीस आली.

सिंदखेड राजा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेडतेजन येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच स्वत:चे सरण रचूनविष प्राशन करीत  सरणावरच स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याचीखळबळजनक घटना रविवारी  उघडकीस आली.गजानन अर्जून जायभाये असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्याच्याकडे तीन एकर शेती असून कर्जबाजारीपणा व नापीकीमुळे त्यानेआत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ३५ वर्षीय गजानन अर्जूनजायभाये याच्यावर महाराष्ट्र बँकेचे ७० हजार रुपयांचे पीक कर्ज होते.त्यातच कर्जमाफीच्या गोंधळामुळे पुन्हा त्याला कर्ज मिळू शकले नाही.त्यामुळे  उधार-उसनवार करून करून त्याने  बी, बियाणे, खत घेऊन पेरणी केलीहोती.  त्यातच सततची नापिकी, पावसाची ओढ व कर्जबाजारीपणामुळे घरप्रपंचचालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. त्यामुळे तणावाखाली येऊन गजाननअर्जून जायभाये याने आत्महत्या केल्याची माहिती ज्ञानदेव कारभारी जायभायेयांनी पोलिस ठाण्यात दिली. यासंदर्भातील तक्रारीमध्ये  त्यांनी म्हंटलेआहे की, २९ जुलै रोजी सकाळीच गजानन शेतात गेला होता. औषध फवारणीकरण्यासाठी विषारी किटकनाशक, पंपाचा स्प्रे करण्यासाठी रॉकेल त्याने नेलेहोते. दरम्यान, फवारणी करण्याअगोदर शेतातील लाकडे गोळा करून त्याने सरणरचले. सोबतच विषारी औषध प्राशन करून सरणावर स्वत:स जाळून घेऊन आत्महत्याकेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मृत शेतकरी हा पत्नी व पाच वर्षाच्यामुलासह राहत होता.

अशी आली उघडकीस घटनासकाळी त्याचे वडील  अर्जून जायभाये शेतात गेले असता त्यांनी हाप्रकार पाहिला व घटेची घरी माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी विषारीकिटकनाशकाची बाटली, रॉकेलचा डबा आणि गजाननच्या अंगातील कपडे आढळून आलेआहेत. प्रकरणी सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार, पोलिस हेडकान्स्टेबल बालाजीफलटनकर, राजू घोलप यांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंदकेली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार व त्यांचेसहकारी करीत आहेत.

घटनास्थळीच आढळले कपडेमृत गजानन जायभाये याचे घटनास्थळानजीकच कपडे आढळून आले आहेत. याप्रकरणाचा प्राथमिक तपास सिंदखेड राजा पोलिस करीत असून मृतकाच्यानातेवाईकाने प्रकरणात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी