लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील शेतमजुराचा बैलगाडीतून पडल्याने बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. माळवंडी येथील सर्जेराव लक्ष्मण काळे (वय ५०) ६ जून रोजी संध्याकाळी शेतातून बैलगाडी घरी आणत असताना बैलगाडीतून खाली पडले. रस्त्यावर दगड असल्यामुळे ते जखमी झाले. त्यांना अकोला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान सर्जेराव काळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी असा परिवार आहे. वृत्त लिहेपर्यंत रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बैलगाडीतून पडून शेतमजुराचा मृत्यू
By admin | Updated: June 8, 2017 02:33 IST