शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट? एका उमेदवाराने पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; दोन जण पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:32 IST

बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग ...

बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग क्र. ६ मधील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे स्थानिक नागरिकांनी एका संशयित मतदाराला बनावट ओळखपत्रासह पकडले. मात्र, हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देताच त्या प्रभागातील एका उमेदवाराने स्वतःच्या नातेवाइकाच्या मदतीने त्याला पळवून लावल्याची खळबळजनक घटना घडली. समाजमाध्यमांवर सध्या त्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे.

दरम्यान, प्रभाग क्र. १५ मधील गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरही कोथळी (ता. मोताळा) येथून कथितरीत्या मतदानासाठी आलेल्या दोन जणांना स्थानिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. प्राथमिक पडताळणीत त्यांची ओळख संशयित असल्याचे समोर आले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ शरद पाटील यांनी दिली. दोन्ही प्रकरणांच्या चौकशीला सुरुवात झाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

प्रभाग ६ मधील तणावग्रस्त परिस्थिती--जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राजवळ २०० मीटरच्या आत बोगस मतदार फिरत असल्याचे लक्षात येताच काही प्रतिनिधींनी त्याला रोखले व चौकशी केली. त्याच्याकडे सापडलेल्या बनावट ओळखपत्रामुळे संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावे, असा प्रयत्न होत असतानाच उमेदवार व त्याच्या नातेवाइकाने तो संशयित युवक पळवून लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे केंद्र संवेदनशील बनले असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

घाटाखालून दोन गाड्या भरून बोगस मतदार आलेसपकाळकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादाला अधिक हवा देत समाजमाध्यमावर पोस्ट केली. घाटाखालून दोन गाड्यांत बोगस मतदार आणले गेले आणि काहींनी दुसऱ्याच नावावर मतदान करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तत्काळ कारवाईची मागणीही त्यांनी केली असून त्यामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, बोगस मतदानाचा प्रयत्न हा एक वर्षांच्या शिक्षेस पात्र गुन्हा आहे. दोन्ही घटनांमुळे निवडणुकीतील शुचितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Voters Surge in Buldhana; Candidate Rescues One, Two Apprehended

Web Summary : Buldhana municipality elections marred by fake voter allegations. A candidate helped a suspect escape police custody. Two others were caught attempting fraudulent voting at a different polling location. Investigations are underway, raising concerns about election integrity.
टॅग्स :buldhanaबुलडाणाElectionनिवडणूक 2024