शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२.९२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:53 IST

पोलिसांनी २ लाख ९२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा : दोन हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा घेऊन येणाऱ्या दोघांना बोराखेडी पोलिसांनी मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक शिताफीने पकडले. ही कारवाई सोमवारी पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान केली. पोलिसांनी २ लाख ९२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र सदाशिव बोरले (५५, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (४५, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन दुचाकीने मलकापूरकडून मोताळ्याकडे येत होते. बनावट नोटांची गुप्त माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, पोलीस हेड काँस्टेबल नंदकिशोर धांडे, पोलीस काँस्टेबल संजय गोरे, चालक समीर शेख यांनी सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. यावेळी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण हे दोघे जण दोन दुचाकीवर मोताळ्याकडे येताना दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यात दोन हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा मिळून आल्या. या नोटांचे दर्शनी मूल्य २ लाख ९२ हजार आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा, दोन दुचाकी व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एका दुचाकीला समोरील बाजूस वेगळी व मागील बाजूस वेगळी अशा दोन नंबर प्लेट आहेत. बोराखेडी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी राजेंद्र बोरले याच्याविरुद्ध मलकापूर शहर व पुणे येथे यापूर्वी बनावट नोटांसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळा