शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

बनावट सातबाऱ्यावर अस्तित्वात आणलेला फेरफार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:18 IST

खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात  मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  शहरातील बहुचर्चित जमीन घोटाळ्यातील एका प्रकरणात बनावट सातबारा तयार करून अस्तित्वात आणण्यात आलेला फेरफार उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला आहे. परिणामी, संबंधित प्लॉट मुळ मालकाच्या नावे  होण्याचा मार्ग मोकळा झाला. तथापि अद्यापही ९३ प्रकरणात फेरफार रद्द करण्याची प्रतीक्षा कायम आहे.खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात  मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले. या सातबाराच्या आधारे फेरफार अस्तित्वात आणले. त्यानंतर आपल्या मर्जीतील दलाल पंकज घोरपडे आणि इतरांच्या मदतीने  या भूखंडांची विक्री केली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने साखळी तयार करून कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. खामगाव शहरातील मोक्याच्या जागा आणि गृहनिर्माण सोसायटी यातील तब्बल ९४ प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे पुढे येताच महसूल विभागाने  या प्रकरणी तलाठी चोपडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच फसवणूक झालेल्या इतर दोघांनी चोपडे विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. या तक्रारिंच्या आधारे राजेश चोपडे विरोधात तीन वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. सद्यस्थितीत दोन गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.

अखेर फेरफार रद्द!घोटाळा प्रकरणातील क्र. २२२९२(२७/११/२०१८) गाव नमुना ६ फेरफार नोंदवहीतील अ. क्र.१ नुसार फेरफार क्रमांक २२२५ हा वाद जमिनी संबंधि अस्तीत्वात आणण्यात आल्याने सदर फेरफार रद्द करण्यात आला. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अपिलार्थीचे खरेदी खत क्रमांक १०४१/१९८९ नुसार महसूल अभिलेखात नोंद घेण्याच्या कार्यवाहीचे आदेश उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिलेत.दैनंदिन कामकाज व्हावे!फसवणूक प्रकरणी एक फेरफार रद्दचे आदेश  दिले. मात्र घोटाळ्याप्रकरणी तब्बल अद्यापही ९३ प्रकरणी अनेकांना न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे फेरफार रद्द प्रकरणी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी दैनंदिन कामकाज करून अनेकांना न्याय द्यावा. 

टॅग्स :khamgaonखामगाव