शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची उचल मिळेना, तांदळाची टंचाई; पुरवठा विभाग मेटाकुटीला!

By अनिल गवई | Updated: March 4, 2024 17:54 IST

खामगाव आणि वाशिम येथील गोदामातून उचल देणे बंद असल्यामुळे अकोला येथील गोदामावर ताण वाढत आहे.

खामगाव: अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या (सीडब्ल्यूसी गोदाम ) क्रमांक १ आणि २ येथून धान्य उचलीसाठी येणार्या अडचणींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक आणि वितरण प्रणाली संकटात सापडली आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही वेळेवर धान्याची उचल मिळत नाही. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यात तांदळाची टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी गव्हाचाही अत्यल्प पुरवठा होत असल्याने, पुरवठा विभाग मेटाकुटीस आल्याची चर्चा आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक १ आणि २ अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या तांदूळ आणि गव्हाची उचल दिल्या जाते. खामगाव आणि वाशिम येथील गोदामातून उचल देणे बंद असल्यामुळे अकोला येथील गोदामावर ताण वाढत आहे. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यातील उचल प्रभावित झाली असून, फेब्रुवारी महिन्यात केवळ १६ दिवस उचल देण्यात आली. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक आणि वितरण प्रणाली प्रभावित झाल्याने, जिल्हा पुरवठाविभागाकडून अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यात अधिकाअधिक वाहने भरून धान्य उचल देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सुटीच्या दिवशीही साठा अधिक्षक यांना आपल्या स्तरावरून उचल देण्याचे सुचविण्यात आले. मात्र, तरी देखील बुलढाणा जिल्ह्यातील धान्य उचल बाबत केंद्रीय वखार महामंडळाकडून दिरंगाई केली जात असल्याची ओरड आता होत आहे.

फेब्रुवारीचेही वितरण प्रलंबितअकोला येथील दोन्ही गोदामातून धान्य उचल मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात फेब्रुवारीचेही वितरण प्रलंबित आहे. तर मेहकर व लोणार तालुक्यातील शासकीय गोदामातून रास्तभाव दुकानदारांना तांदळाचे वाटप करणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठा नसल्याने धान्याची उचल देण्यास िवलंब होत आहे. धान्य उचलबाबत आपल्याकडील जिल्हा पुरवठा विभागालाच विचारा. आपण उत्तर देण्यास बांधिल नाही.नितिश नाईक, गोदाम व्यवस्थापक, सीडब्लूसी गोदाम क्रंमांक १ अकोला.वखार महामंडळाच्या गोदामावर एकाच वेळी ताण वाढला आहे. त्यामुळे उचल देताना तांत्रिक अडचण येत आहे. तरी, सोमवारपासून बुलडाणा जिल्ह्यातील धान्याची उचल नियमित दिली जाईल.

ज्योती बुरडे, विभागीय व्यवस्थापक केंद्रीय वखार महामंडळ, अमरावती.

टॅग्स :buldhanaबुलडाणा