नीलेश शहाकार / बुलडाणा गतवर्षीच्या अल्प पावसाचा अनुभव घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने ३0 जुलै २0१६ पर्यंंतच्या केलेल्या चारा नियोजनाला शेतकर्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यात असणार्या जनावरांना यंदा चार्याची टंचाई भासली नाही. १ ऑक्टोबर २0१५ ते ३१ मे २0१६ या कालावधीत तब्बल १0 लाख टन चार्याचे नियोजन केल्यामुळे जवळपास ११ लाख जनावरांची सोय झाली.गत पाच वर्षांंपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांची उभ्या पिकांची नासाडी झाली. डोक्यावर आर्थिक अडचणीचा डोंगर चढत असताना आपल्याकडील जनावरांना जगवावे कसे, असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला होता. शेतकर्यांची बरीच जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर होती, तर काही शेतकर्यांनी आपली जनावरे विकून टाकली.जिल्ह्यात असणारी गायवर्गीय जनावरे, शेळ्या व मेंढय़ा अशा १0 लाख ९७ हजार जनावरांसाठी चारा टंचाईच्या परिस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार एका लहान जनावराला प्रतिदिन तीन किलो, मोठय़ा जनावराला प्रतिदिन सहा किलो व शेळ्या-मेंढय़ांसाठी 0.६00 किलो अशाप्रकारे आवश्यतेनुसार ११ लाख ५१ हजार ६५७ टन चार्याचे नियोजन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले. विशेष म्हणजे, या नियोजननुसार ९ लाख ५५ हजार ७४६ टन चारा उपलब्ध करून जनावरांची सोय करण्यात आली.
दुष्काळात ११ लाख जनावरांच्या चा-याची सोय
By admin | Updated: June 17, 2016 02:27 IST