शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!

By admin | Updated: June 8, 2017 02:31 IST

१५० महिलांचा सहभाग : ६५० नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नेत्रदानाचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील गत वर्षभरात ६५० नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. यापैकी १५० महिलांनी आपल्या मृत्यूनंतर हे सुंदर जग दुसऱ्या कुणाला स्वत:च्या डोळ्यांनी पाहता यावे, याकरिता नेत्रदान करण्याचा संकल्प करून सामाजिक दायित्व जोपासले आहे.नेत्रदानासाठी सर्वत्र मोहीम राबविली जात असताना, अनेक सामाजिक संस्थासुद्धा शिबिरांच्या माध्यमातून याविषयी प्रबोधन करताना आढळून येतात. जिल्हात विविध रुग्णालयात गत वर्षभरात जवळपास ६५० स्त्री-पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यामध्ये १५० स्त्रिया आणि ५०० पुरुषांनी आपली नावे नोंदविली. इतर अवयव दान करण्याबरोबरच नेत्रदानामुळे आपले डोळे आपल्या मृत्युनंतर गरजू व्यक्तीच्या कामी येईल. या भावनेतून नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे.मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील कोणतीही व्यक्ती संकल्पपत्र भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो, अशी व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या मरण पावली असता, त्या व्यक्तीचे डोळे सहा तासांच्या आत काढल्यास त्याचा उपयोग दृष्टीहीन व्यक्तीला होतो. डोळ्यांचे रोपण करण्याआधी त्याच्या आजाराची योग्य ती तपासणी करण्यात येऊन डोळ्यांची अवस्था निरोगी आढळून आली, तरच ते रोपण केल्या जातात.ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी जागृती आवश्यकजिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही नेत्रदात्याचे प्रमाण कमी आहे. याचे कारण म्हणजे ग्रामीण जनतेमध्ये असलेली अंधश्रद्धा व नेत्रदानाविषयी असलेले अज्ञान, पुनर्जन्मावर असलेला ठाम विश्वास, यामुळे ते लोक नेत्रदान करण्यास धजावत नाहीत. मात्र, सुशिक्षित पिढी यातून बाहेर निघताना दिसत आहे. आज तरुण पिढीने ‘नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान’ असे नेत्रदानाचे महत्त्व ओळखले आहे. तरीही नेत्रदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.