शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात रुजतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

बुलडाणा: भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला ...

बुलडाणा: भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे. पश्चिम वऱ्हाडातही हा विषमुक्त शेतीचा प्रयोग रुजत आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेण्यात येत आहे.

कमी काळात, कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर पिकांवर केला जात आहे. बाजारातही अशी अनेक रसायने उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा रसायनांच्या माध्यमातून भाजीपाला लागवड होत असल्याने, अनेकांना केमिकलपासून उत्पादित केलेल्या भाज्या सेवन केल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिणामी, बहुतांश ग्राहकांचा कल आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याकडे वाढला आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. जून ते जुलै या कालावधीमध्ये ही लागवड करण्यात आलेली आहे.

पश्चिम वऱ्हाडातील परसबागा

बुलडाणा: ९७८४

अकोला: ५२९४

वाशिम: ५०२२

वर्षभर खा विषमुक्त भाजीपाला

आपल्या परिवाराला बाराही महीने विषमुक्त ताजा भाजीपाला मिळावा, वेगवेगळ्या भाज्या नियमित आहारात मिळाव्यात, याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने माझी पोषण परसबाग मोहीम राबविली. त्यात बुलडाणा जिल्ह्याने दिलेले परसबागेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परसबागा या ग्रामीण भागात तयार करण्यात आल्या असून, त्याचा फायदा महिलांना वर्षभर होणार आहे. १२ ही महिने महिलांना त्यांच्या परिवाराला विषमुक्त, ताजा भाजीपाला आहारात देता येणार आहे.

स्वप्निल आराख, जिल्हा व्यवस्थापक, उमेद बुलडाणा.

राज्यभर राबविली ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम राज्यभर राबविण्यात आली. १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यात आल्या. या अभियानाला पश्चिम वऱ्हाडातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.