शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात रुजतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:39 IST

Experiment of non-toxic agriculture : उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे. पश्चिम वऱ्हाडातही हा विषमुक्त शेतीचा प्रयोग रुजत आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेण्यात येत आहे.कमी काळात, कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर पिकांवर केला जात आहे. बाजारातही अशी अनेक रसायने उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा रसायनांच्या माध्यमातून भाजीपाला लागवड होत असल्याने, अनेकांना केमिकलपासून उत्पादित केलेल्या भाज्या सेवन केल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिणामी, बहुतांश ग्राहकांचा कल आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याकडे वाढला आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. जून ते जुलै या कालावधीमध्ये ही लागवड करण्यात आलेली आहे. 

वर्षभर खा विषमुक्त भाजीपालाआपल्या परिवाराला बाराही महीने विषमुक्त ताजा भाजीपाला मिळावा, वेगवेगळ्या भाज्या नियमित आहारात मिळाव्यात, याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने माझी पोषण परसबाग मोहीम राबविली. त्यात बुलडाणा जिल्ह्याने दिलेले परसबागेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परसबागा या ग्रामीण भागात तयार करण्यात आल्या असून, त्याचा फायदा महिलांना वर्षभर होणार आहे. १२ ही महिने महिलांना त्यांच्या परिवाराला विषमुक्त, ताजा भाजीपाला आहारात देता येणार आहे.- स्वप्निल आराख, जिल्हा व्यवस्थापक, उमेद बुलडाणा.

राज्यभर राबविली ‘माझी पोषण परसबाग’ मोहीममहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम राज्यभर राबविण्यात आली. १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यात आल्या. या अभियानाला पश्चिम वऱ्हाडातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती