बुलडाणा : जिल्ह्यात जीवनदायी योजना सुरू झाल्यापासून ६ हजार ६७२ रुग्णांवर विविध आजारांवर उपचार झाले. उपचारासाठी ६ हॉस्पिटलकडून २९ कोटी ४४ लाख रुपये बिल शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत या बिलापोटी १२ कोटी ३४ लाखांची रक्कमही अदा केली असून, ही योजना अतिशय लाभदायी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे . राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थींवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील ६ हॉस्पिटलना अधिकृत केले आहे. अशा रुग्णांवर उपचार केल्यानंतर संबंधित हॉस्पिटलला विमा कंपनीत बिल अदा केले जाते. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ८ हजार ४४७ कुटुंबांनी नोंद केली असून, या कुटुंबामधील १0 हजार ६३७ सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ नोव्हेंबर २0१३ ते २८ जानेवारी २0१५ पर्यं त ६ हजार ६७२ रुग्णांनी विविध आजारासाठी या योजनेतून लाभ घेतला आहे. या योजनेबाबत अजूनही व्यापक जनजागृती नसल्यामुळे दोन वर्षात नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत नाही त्यामुळे जनजागृतीची गरज आहे.
दोन वर्षात जीवनदायीतून २९ कोटींचा खर्च
By admin | Updated: January 31, 2015 00:48 IST