शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

संशयित दहशतवादी जुनेदच्या कबुली जबाबामुळे खामगावात खळबळ!  

By अनिल गवई | Updated: August 24, 2022 14:36 IST

एटीएस पथकाने दोन दिवसांपूर्वीच गोंधनापूर येथे भेट दिल्याने, याप्रकरणातील गूढ वाढत असल्याची चर्चा आहे.

खामगाव : पुण्यातील दापोडी येथून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी मो. जुनेद हा मूळ खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील आहे. त्याने दहशतवादी कटात सहभागी असल्याची धक्कादायक कबुली दिल्याने खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी जुनेदच्या संपर्कातील काहींचा शोध दहशतवाद विरोधी पथकाने चालविल्याची माहिती समोर येत आहे. 

एटीएस पथकाने दोन दिवसांपूर्वीच गोंधनापूर येथे भेट दिल्याने, याप्रकरणातील गूढ वाढत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र दहशत वाद विरोधी पथकाने पुण्यातील दापोडी येथून २४ मे रोजी मो. जुनेद या संशयीत दहशतवाद्यास अटक केली होती. त्यावेळी काश्मीरमधील दहशतवादी संघटना या घातपात आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी जुनैदला पैसा पुरवत असल्याची माहिती समोर आली होती. 

जुनैद हा वेगवेगळ्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करुन आपल्या दहशतवादी सहकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसकडून दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार जुनेदने अनेक गंभीर गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर येत आहे.

ईदसाठी आला होता गावात...मो. जुनेद याचे कुटुंबिय खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथे वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वीच मो. जुनेद हा गोंधनापूर येथे ईदसाठी येऊन गेला होता. त्यामुळे तो संपर्कात असलेल्यांचा आता शोध घेतल्या जात आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पथकाकडून गोंधनापूर येथे तपास करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्राथमिक शिक्षण गोंधनापूरातसंशयित दहशतवादी मो. जुनेद याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने खामगाव येथे घेतले. त्यानंतर तो बहिणीकडे पुण्यात वास्तव्यास आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात...जम्मू-काश्मिरातील दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांच्या  मोहमद जुनेद हा संपर्कात होता. तो वेगवेगळ्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करुन आपल्या दहशतवादी सहकाºयांच्या संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा