शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाच्या भिंतीजवळ उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:27 IST

मेहकर: तालुक्यातील आंध्रुड येथील शासकीय पाझर तलावाच्या सांडव्याच्या मुख्य भिंतीजवळ बेकायदेशीर पणे उत्खनन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार आंध्रुड येथील सरपंच आश्विनी देशमुख यांनी मंगळवारी तहसीलदारांकडे केली आहे.

मेहकर: तालुक्यातील आंध्रुड येथील शासकीय पाझर तलावाच्या सांडव्याच्या मुख्य भिंतीजवळ बेकायदेशीर पणे उत्खनन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार आंध्रुड येथील सरपंच आश्विनी देशमुख यांनी मंगळवारी तहसीलदारांकडे केली आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाºया मुरूमासाठी हे उत्खनन होत असून याचा पाझर तालावाला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील आंध्रुड गावावरून समृद्धी महामार्ग जात असून या महामार्गाच्या कामाला सध्या वेग आला आहे. या महामार्गास लागणारे गौण खनिज शासनाने प्रस्तावित केलेल्या जागेवरूनच उचलावे त्यानुसार संबंधित अधिकाºयांनी संबंधित कंपनीला सीमा निश्चित करून दिल्या आहेत. तरीसुद्धा ठराविक नेमून दिलेल्या जागेवरून गौण खनिज न उचलता शासकीय पाझर तलावाच्या मुख्य भिंतीजवळ व सांडव्या जवळ गौण खनिज उचलल्या जात आहे. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या पाझर तलावाला संभाव्य धोका निर्माण झालेला आहे. यामुळे पाझर तलाव निकामी होऊ शकतो. या पाझर तलावात पाणी थांबणार नाही. त्यामुळे गावाचे तर नुकसान होईल. शिवाय जनावरांना पिण्याला पाणी सुद्धा राहणार नाही. सद्यस्थितीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे व पाझर तलावाचे हे नुकसान अडचणीत भर घालणारे आहे. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित कंपनी ग्रामपंचायत हद्दीतील राखीव जागेतून सुद्धा बेकायदेशीरपणे गौण खनिज घेऊन जात असल्याची आरोड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. येथे झालेल्या बेकायदेशीर गौण खनिज प्रकरणामुळे  त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंध्रुड येथील सरपंच आश्विनी नंदकिशोर देशमुख यांनी तहसीलदारांकडे केली आहे. पाणीपुरवठा पाईप लाईनचे नुकसान या अगोदरही आंध्रुड येथील सरपंचांनी  जिल्हाधिकाºयांना नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या गौण खनिजाच्या उत्खननाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतू याची कुठलीच चौकशी न झाली नाही. याबरोबरच समृद्धी महामागार्चे काम करणाºया कंपनीने प्रस्तावित केलेल्या जागेवर गौण खनिज उत्खनन न करता ग्रामपंचायतच्या नाल्याजवळील व ई क्लास जमिनीवर बेकायदेशीरपणा उत्खनन करीत आहे. पाझर तलावा जवळ उत्खनन करून तलावाच्या जलाशयात धोका निर्माण झाला आहे. यासोबतच पाणीपुरवठा पाईप लाईनचेही नुकसान केल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.  आधं्रूड येथील शासकीय पाझर तलावाच्या ठिकाणी झालेल्या उत्खननाबाबत स्वत: चौकशी करतो. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. संजय गरकल, तहसिलदार, मेहकर. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर