शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:32 IST

Excavation and storage of excess sand : शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील   ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाढीस लागले असतानाच, गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेतीसाठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील   ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले. त्यामुळे रेती माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

- शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केल्या जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाºयांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली. शनिवारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे,  संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, बांधकाम विभागाचे ढाकणे, मंडळ अधिकारी चांभारे, मंडळ अधिकारी जी.आय.राऊत, तलाठी पी.एम.नलावडे, तलाठी डाबेराव, पोलिस पाटील गोपाल सोळंके, चालक सातभाकरे यांच्यासह जलंबचे ठाणेदार धीरज बांडे, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, रविंद्र लांडे,  वनविभागाचे   पी.जी.सानप यांच्यासह महसूल, वन विभागाच्या अधिकाºयांनी चोख पोलिस बंदोबस्तात ही धडक कारवाई केली.

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळू