मेहकर (बुलडाणा): पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना लिटमस पेपर पेट्रोलपंपधारकांनी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ४ जुलै रोजी प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार निर्भय जैन यांनी शहरातील पेट्रोल पंपांची तपासणी करुन पेट्रोल पंपावर भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मंगळवारला देण्यात आल्या.पेट्रोल, डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी पेट्रोलपंपावर लिटमस पेपर ठेवणे अनिवार्य आहे. ग्राहक पेट्रोलियम विभागाच्या नियमानुसार पेट्रोलपं पधारकास लिटमस पेपरची मागणी करु शकतात. पेट्रोल पंपवर लिटमस पेपर उपलब्ध करुन न दिल्यास पहिल्या पाहणीत दहा हजार रुपये, दुसर्यावेळी २५ हजार तर तिसर्या वेळेस १ लाख रुपयांचा दंडही आकारल्या जाऊ शकतो. तसेच पेट्रोलपंपधारकावर परवाना निलंबनाचीसुद्धा कारवाई होऊ शकते. पेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी पांढर्या लिटमस पेपरचा उपयोग होतो. या पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकल्यास तो पेपर निळा झाल्यास पेट्रोल भेसळयुक्त असल्याचे समजते. लिटमस पेपरचा रंग न बदलल्यास पेट्रोलमध्ये भेसळ नसल्याचे प्रमाणित होते. पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना लिटमस पेपर पेट्रोलपंपधारकांनी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर या नियमांचे पालन केल्या जात नाही. तेव्हा 'पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली' या म थळ्याखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार निर्भय जैन यांनी शहरात पेट्रोल पंप तपासणी मोहीम राबविली. तसेच सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करुन पेट्रोल पंपधारकांना पेट्रोल पंपावर भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर ग्राहकांना उ पलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या.
तहसीलदारांकडून पेट्रोलपंपाची तपासणी
By admin | Updated: July 10, 2015 00:00 IST