शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पूर्वतपासणी शिबिरात १० हजार रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:03 IST

पुर्वतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: जनतेला सुदृढ व निरोगी आयुष्य मिळावे या उद्देशाने स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबीर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा केशव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी यांच्या संकल्पनेतून सुंपर्ण चिखली मतदार संघात राबविण्यात येत आहे. २९ जुलै ते १० आॅगस्ट दरम्यान पुर्व तपासणी शिबीर होत असून या पुर्वतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली आहे.शिबिरासाठी एकूण १४ डॉक्टर्सं व १०३ वैद्यकिय विद्यार्थी असे एकूण ११८ जण संपुर्ण मतदार संघात आरोग्यसेवा देत आहेत. या सर्वांना १४ वेगवेगळया चमुमध्ये विभाजित करण्यात आले आहे. चमु एकाच वेळी मतदार संघातील १४ गावांमध्ये वैद्यकिय सेवा देत आहे. पुढील काही दिवसात ही चमु उर्वरित गावांना भेट देणार असून तेथील नागरिकांची तपासणी करणार आहे. दररोज सकाळी ६ वाजता चमुतील संपुर्ण सदस्य डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय येथे एकत्र येतात. तेथुन आवश्यक ते साहित्य घेऊन गावांना भेट देतात. या शिबिरामार्फत एक लाख रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे शिबिराचे आयोजक अ‍ॅड. विजय कोठारी यांनी सांगितले. या पुर्व तपासणी शिबिराला आतापर्यंत अ‍ॅड. विजय कोठारी यांचेसह शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला , चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिशजी गुप्ता, डॉ. सौरभ कोठारी भाजपाचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या असून आवश्यक त्या सुचना करीत आहेत.११ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिखली येथील मौनिबाबा संस्थानमध्ये आरोग्य तपासणी महाशिबीर संपन्न होणार आहे. या शिबिराचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार आहे.या शिबिरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथील तज्ञ डॉक्टर्स आपली सेवा देणार आहेत. तसेच सर्व नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टीक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्री-रोग, कर्करोग, दंतरोग, श्वसनविकार व क्षयरोग, ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग यासोबतच जनरल मेडीसीन यासर्व प्रकारच्या विकारांची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबिराचा मतदार संघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. विजय कोठारी यांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली