शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीतेचे अवलोकन केल्यास प्रत्येक गाव आदर्श बनू शकते : आकाश फुंडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:08 IST

माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव  लोकमत न्युज नेटवर्क  खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून ...

माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव 

लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आमदार आकाश फुंडकर यांनी केले. माटरगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव पार पडला त्यावेळी ते बोलत होते.   कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आचार्य वेरुळकर गुरुजी होते. तर मंचावर आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचेसह जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई देवचे, माजी जि प बांधकाम सभापती सुरेशभाऊ वनारे, भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र देवचे, अनंतराव आळशी,  पंचायत समिती सदस्य रायातुल्लाह खान, सरपंच सौ शुद्धमती निखाडे, ह.भ.प भिकाजी मिरगे, ह.भ.प गजानन देवचे, गोपाळराव मिरगे, समाधान ठाकरे, त्रंबकराव आळशी, डॉ वराडे, भगवान भोजने, शिवाजी वानखडे, किसनराव दळवी, रामकृष्ण मारके, प्रल्हाद वाघ, वासुदेव काळे , सुखदेव कुसुंबे, भाऊसाहेब लांडे , तुळशीराम आळशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मरण केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मौल्यवान विचार ग्रामगीता मध्ये आहेत. ग्रामगीतेत जीवनाचे सार आहेत, याचे अवलोकन करून त्याप्रमाणे जगल्यास आपले जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तसेच समाजाचेही सार्थक होईल. ५७ वर्षाआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पावन स्पर्श माटरगावला लाभले , त्यांनी येथे सेवा दिली, अश्या पावन ठिकाणी महाराजांचा ५० व्या पुण्यतिथी सोहळ्यात उपस्तीत राहण्याचा लाभ मिळाला याचे मी धन्य मानतो. गुरुदेव सेवा मंडळ चांगले समजोपयोगी कार्य करत आहेत, असेच कार्य त्यांचे हातून घडत राहो , मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सहवासात समाजकार्य करणाºया जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामगीता वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज