शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी खर्चले तरी जनुना तलाव बगीचा भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:55 IST

खामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.खामगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर जनुना तलाव आहे. गेल्या दीडशे वर्षापूर्वी तलावाची निर्मिती करण्यात आली होती. निसर्गर्म्य वातावरण असल्याने याठिकाणी बगिचा तयार करण्यात आला. आबाल वृध्दांच्या पसंतीचे ठिकाण तलाव बनला. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष शंकरराव बोबडे यांनी विस्तारीकरणासाठी पुढाकार घेतला. त्याठिकाणी बालकांची करमणूक व्हावी म्हणून काही प्राणी, पक्षी ठेवण्यात आले. ज्यामुळे तलाव बगिचाचे आकर्षण वाढू लागले. मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटक येवू लागले. हा तलाव एक पर्यटन स्थळ म्हणून समोर आल्यानंतर याठिकाणी सर्व सुविधायुक्त प्रशस्त अशा सार्वजनिक बगिचाच्या विस्तारीकरणासाठी व सौंदर्यीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपये २०१४ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. बगिचाचे उद्घाटन झाल्यानंतर काही प्रमाणात कामही झाले. मात्र प्रस्तावित आराखड्यानुसार काम पुर्ण होवू शकले नाही. मध्येच ते रखडले. त्यानंतरच्या काळात व सध्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुर्णपणेबगिचाच्या सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे निधीतून कोणता विकास पालिका प्रशासनाने केला याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

निगा न राखल्याने वास्तू तुटून पडल्या बगिचामध्ये लाखो रुपये खर्चून सांबर, हरिण, ससे, मोर, हत्ती अशा प्राण्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामुळे बगिचाच्या सौंदर्यात भर पडली होती. कालांतराने त्याची निगा न राखल्याने ह्या प्रतिकृती तूटून पडल्या आहेत. तर ससे ठेवण्यासाठी केलेले पिंजरा घर फक्त नावालाच उरले आहे. त्यातील ससे गायब झालेले दिसून येतात.

 

टॅग्स :khamgaonखामगाव