शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविल्यावरही वाहतुकीची कोंडी कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:23 IST

रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने या मोकळ्या जागेत उभी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. दररोज टप्प्याटप्प्याने शहरातील अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात येत आहे. मात्र अतिक्रमण काढलेल्या जागेवर खासगी प्रवासी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी कायम आहे.बुलडाणा शहरात रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. टीनशेड उभारून पक्की दुकाने बनविण्यापर्यंत या व्यावसायिकांची मजल गेली होती. स्वत:चीच जागा असल्याच्या आविर्भावात ही मंडळी वावरताना दिसत होती. एवढेच नव्हे तर अतिक्रमित जागा खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील सुरू होते. या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी उलाढाल शहरात होत असल्याची माहिती मध्यंतरी कानावर पडत होती. या सर्व प्रक्रियेत रस्ते मात्र अरुंद झाल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने १ डिसेंबरच्या अंकात ‘बुलडाणा शहराला अतिक्रमणाचा वेढा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून पालिकेचे लक्ष वेधले होते. यानंतर ५ डिसेंबर पासून पालिकेने अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरूवात केली होती. मात्र काही नेमक्याच अतिक्रमणावर कारवाई करून ही मोहिम थंडबस्त्यात पडली होती. मात्र यानंतर २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न समोर आला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला शहरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात निर्देश दिले. यानुसार पालिकेने २८ डिसेंबर पासून अतिक्रमण हटाओ मोहिमेस सुरूवात केली आहे. याअंतर्गत शहरात टप्प्याटप्प्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने या मोकळ्या जागेत उभी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कायम असून अजुनही वाहनधारक त्रस्त आहेत. पोलिस प्रशासनानेदेखील मोकळ्या जागेवर प्रवासी वाहने उभी राहणार नाहीत, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा