शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: March 11, 2015 01:53 IST

शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ.

बुलडाणा : शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना जास्तीतजास्त उत्पन्न मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात उत्पादक कंपनी स्थापन केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत तसेच नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यात २0 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येणार असून, यापैकी आठ कंपन्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे मालक झाले असून, त्यांचे जीवनमान आणि आर्थिकस्तर उंचावण्यास मोलाची मदत होणार आहे.ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती देऊन अशा कंपन्यांची स्थापना ही शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यात स्थापन होऊ घातलेल्या शेतकरी कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित दहा कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या कंपन्यांना बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मदत करीत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी कापूस, डाळ, केळी, दूध अशा विविध शेतमालावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचेही काम करणार आहेत. शिवाय या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही निर्यात करण्यावर प्राधान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये शेतकरी कंपनीसाठी शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत, त्यासाठी या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एमएएसपी प्रकल्पातून अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित भागभांडवल शेतकर्‍यांना उभे करायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेमुळे जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ झाले आहे.