शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना ७ ते ११ वाजेपर्यंत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:53 IST

Buldhana News : २० मे च्या सकाळी ६ वाजेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आनुषंगिक निर्बंध कायम राहतील.

बुलडाणा : कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात १० मेपासून लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. यासोबतच खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कृषीशी संबंधित बाबींनाही या निर्बंधांतून सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत सूट देण्यात आली आहे, असे असले तरी उपरोक्त कालावधीव्यतिरिक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणांशिवाय कोणासही घराबाहेर पडण्यास बंदी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आनुषंगिक आदेशात स्पष्ट केले आहे. २० मे च्या सकाळी ६ वाजेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आनुषंगिक निर्बंध कायम राहतील.

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या २३ मेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी  जिल्हा उपनिबंधकांवर राहील.

वकिलांची कार्यालये राहणार सुरूवकिलांची कार्यालये, तसेच चार्टर्ड अकाउंटंटची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त सराफा व्यावसायिकांसाठीही दुकान उघडून तपासणी करण्याकरिता गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही दुकाने राहणार सुरू

किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकानांसह इतर सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला व फळविक्रीची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने, उद्योगगृहे, पाळीव प्राणी, खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळी हंगाम सामग्रीची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल व सीएनजी या कालावधीत सुरू राहतील.

बँका दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणारजिल्ह्यातील बँका या सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. येथे शेतकरी व ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता बँकेच्या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याची पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील. कोरोना प्रतिबंधांच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक राहील. पतसंस्था, वित्तीय संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँक व आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था या कालावधीत सुरू राहतील.

शेतकऱ्यांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोलपंप सुरूनिर्बंधाच्या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक वाहनांसोबत शेतातील कामे व मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. कृषी संबंधीत दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपयर्यंत सुरू राहणार आहेत. 

भोजनालय, उपाहारगृहातून ‘होम डिलिव्हरी’निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यात रेस्टॉरंट, भोजनालये व उपाहारगृहांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत केवळ होम डिलिव्हरीद्वारे सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक