शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये प्रवासी घेताहेत मनोरंजनाचा आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:49 IST

शेगाव : प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशेगाव आगारातील एस टी बसेस झाल्या वाय-फाय युक्त !

फहीम देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात ही सेवा दिली जात असून, यात शेगाव आगारातील सर्व ५० गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिल्या गेली आहे.'यंत्र मीडिया सोल्युशन' या कंपनीद्वारे गाड्यांमध्ये वाय-फायचे यंत्र बसविण्यात येणार आहे. वाय-फाय सुविधेच्या वापरासाठी प्रवाशांना प्रथम त्यांच्या मोबाइलमधील वाय-फायचा पर्याय सुरू करावा लागेल. त्यानंतर इंटरनेट ब्राऊझर अ‍ॅप ओपन केल्यानंतर कंपनीने दिलेली यूआरएल टाकावी. त्यानंतर प्राथमिक वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ती माहिती भरल्यानंतर वाय-फाय सेवेचा उपभोग घेता येईल. वाय-फाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्या मोबाइल अ‍ॅपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका पाहता येणार आहेत. प्रवाशांना फक्त एकदाच त्यांचा मोबाइल वाय-फाय यंत्राशी जोडावा लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा नियमित उपलब्ध होईल. त्यासाठी पुन्हा सुरुवातीपासून कार्यवाही करावी लागणार नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे शेगाव बसस्थानक प्रमुख मुसळे यांनी दिली.प्रवाशाला चित्रपट, गाणे किंवा टीव्हीवरील मालिका पाहावयाची असेल, तर ते पाहण्यासाठी वाय-फाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे, तसेच आवडती गाणी, चित्रपटांची मागणीही एसएमएसद्वारे करता येईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर असणारी ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यास लवकरच संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक एसटीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे, असे समजते. आतापर्यंत एसटीच्या गाड्यांमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहे. हॉटस्पॉटची कार्यपद्धती आणि त्याचा वापर याची पाहणी नोव्हेंबर अखेरपर्यंत केली जाणार आहे.मेन्यू होणार रिफ्रेशप्रवासामध्ये वाय-फाय सेवेचा लाभ घेताना चित्रपट, गाणी किंवा मालिका आवडली असेल आणि ती परत पाहण्याची इच्छा झाली, तर वाय-फाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे. तसेच एसएमएसद्वारे पुन्हा त्यांची मागणी करता येणार आहे. त्यानुसार पंधरा दिवसांमध्ये प्रवाशांनी केलेल्या मागणीच्या आधारे मेन्यू रिफ्रेश केला जाणार आहे.