शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

जल व भूमी संधारण अभियानाला बळकटी

By admin | Updated: April 10, 2015 23:34 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ७४ लाखांची तरतूद; ५२ गावांमध्ये कामे सुरू.

नाना हिवराळे /खामगाव (जि. बुलडाणा) : महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये ८४ ठिकाणी माती नालाबांध व सिमेंट नालाबांध तुटफूट दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामासाठी जिल्ह्याला ७४ लाखांची तरतूद झाली असून, अभियानामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बळकटीकरणास मदत होत आहे. राज्यातील शेतीची अवस्था कधी नव्हे इतकी बिकट झाली आहे. शेतीसाठी हवामान, पतपुरवठा तसेच बाजार यापैकी कोणतीच गोष्ट म्हणावी तशी अनुकूल नाही. या सर्व घटकांमध्ये हवामान व विशेषत: लहरी पाऊस अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावत असतो. आपल्याकडील बहुतांश जमीन ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊसही बेभरवशाचा झाल्याने याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर दिसून आला आहे. मोठय़ा प्रमाणावर कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी सिंचनक्षेत्र वाढविण्यास मदत व्हावी, याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान शासनाच्यावतीने राबविणे सुरू आहे. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन उपलब्धता वाढविणे, पडीक जमिनीचा विकास व रोजगार उपलब्धता वाढविणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर झाल्याने गंभीर पाणीटंचाईवर मात करणे ही अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. सन २0१४-१५ करिता जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ८४ ठिकाणी माती नाला बांध व सिमेंट नाला बांध तुटफूट दुरुस्तीच्या कामासाठी ७४ लाख २५ हजार २८५ रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.