राजेश शेगोकार / बुलडाणायुती आणि आघाडी तुटल्यामुळे सर्वच मतदार संघात चौरंगी लढती झाल्या. अशावेळी मनसे आणि भारिप बमसं या पक्षांसमोरचे आव्हान सर्वात मोठे होते. भारिप बमसंला असलेला सोशल इंजिनिअरिंगचा बेस मनसेपेक्षा कितीतरी अधिक मोठा होता. मात्र तरीही भारिपचे सामाजिक सुत्र अपयशी ठरले. मनसेने संपूर्ण जिल्ह्यात संघटनेची नव्याने उभारणी करून गावागावात शाखा सुरू केल्या. गाव तिथे संघटना हे सूत्र राबवत असतांना प्रत्येक बुथवर कार्यकर्ता निवडला मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला संघटना व स्वत:च्या भरवश्यावरच निवडणूकीचा प्रचार करावा लागला. एकही राज्यस्तरीय नेता मनसेच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आला नाही. त्यामुळे वातावरण निमिर्ती झाली नाही. त्याचाही फटका काही प्रमाणात बसला. महाराष्ट्राचे राहू द्या, पक्षातच नवनिर्माणाची गरजमहाराष्ट्र नवनिर्माण सेना असे नाव घेऊन राज्याच्या कानाकोपर्यात हो ! हे शक्य आहे असे ठामपणे सांगत प्रचार करणारी मनसे निकालानंतर जवळपास संपल्यागत जमा आहे. गेल्या वेळी राज्यात १३ जागा जिंकणारा हा पक्ष आता एका जागेवर येऊन ठेपला असुन बुलडाण्यातील निकालांनी मनसेला मनापासुन चिंतन करण्याच्या स्थितीत आणून ठेवले आहे. बुलडाणा, जळगाव जामोद व सिंदखेडराजा या तीन मतदारसंघात तिन जिल्हाप्रमुख उभे होते मात्र चिखली व जळगाव पेक्षाही बुलडाणा व सिंदखेडराजा हे दोनच मतदारसंघ मनसेच्या दृष्टीने महत्वाचे होते. विनोद वाघ नावाच्या तरूणाने सिंदखेडराजामध्ये डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या साम्राज्याला आव्हान दिले. निवडणुकीत वाघ यांनी निर्माण केलेली हवा राजकीय विेषकांनाही लक्ष वेधण्यास भाग पाडणारी होती मात्र त्यांचे इंजिन अवघ्या २४ हजार ८३३ मतांवर विसावले. बुलडाण्यात संजय गायकवाड यांनी प्रचाराची स्टाईल एकदम बदलवून टाकत त्यांनी सामान्यांच्या भावनांना हात घातला. पराभव होऊनही मनसेने येथे घेतलेली मते ही सन्मानजनकच आहेत. जळगावात मात्र तिसरे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांना करीष्मा करता आला नाही. केवळ २३२७ मते घेऊन ते थांबले व चिखलीत विनोद खरपास यांनी ३१0३ मते घेतली.अकोला पॅटर्न बुलडाण्यात रूजेना.अकोला पॅटर्न या नावाने सोशल इंजिनिअरींग सुरू करून अँड.प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात लक्ष वेधुन घेतले. मात्र दुदैवाने हा पॅटर्न आतापर्यंत अकोल्याच्या पलीकडे सरकला नाही. सायकल, उगवता सुर्य अशा निशाण्या बदलत अखेर ह्यकपबशीह्ण हे चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेल्या भारीप-बमसंला बुलडाण्यात मात्र संधी असुनही कपबशी भरता आली नाही. त्यामुळे आता या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.अकोला, बुलडाणा व वाशीम या तिन्ही जिल्ह्यातील भारीप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रिंगणात उ तरले होते. त्यापैकी अकोल्यात बाळापूरमधून बळीराम सिरस्कार हे एकमेव आमदार झाले आहेत. वाशिमसह बुलडाण्यातील प्रकाश गवई व खामगावात अशोक सोनोने हे सुद्धा पराभूत झाले. बुलडाण्यात सात उमेदवार उभे असले तरी खरी लढाई ही खामगाव व जळगाव जामोद मध्येच होती. जळगावात गेल्यावेळी हुकलेला विजय यावेळी हमखास मिळेल, अशी संधी होती मात्र यावेळी पुन्हा एकदा गणित कोलमडले व प्रसेनजित पाटील यांना पराभव पत्करावा लागला.
इंजिन चालले..कपबशी रिकामीच!
By admin | Updated: October 22, 2014 00:00 IST